। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीतर्फे आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना आपत्ती काळात स्वतःच्या सुरक्षेची माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच निखील मयेकर, उपसरपंच रसिका प्रधान, रायगड भूषण जयपाल पाटील, आपत्ती सुरक्षा तज्ञ, इस्पात साळाव कंपनीचे अग्निशमन अधिकारी संदिप ढापरे, नागाव ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, माजी नायब तहसीलदार अनंत जोशी, सदस्य प्राजक्ता करमेकर, ग्रामसेविका श्वेता कदम उपस्थित होते.
यावेळी सरपंच निखिल मयेकर यांनी मागील चक्रीवादळ, पाऊस, वीज कोसळणे याचा अनुभव नागरिकांनी घेतला असून, कशा प्रकारची काळजी घ्यावी याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी नागरीकांना प्रशिक्षण व माहिती दिली. तसेच यावेळी जयपाल पाटील यांनी महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा 112 क्रमांक करावा, अपघात प्रसंगी आरोग्य खाते 108 चा वापर कसा करावा, या प्रात्यक्षिकात अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस शि. राजू शिद, पोलीस शि.महेंद्र इंगळे यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता कदम यांनी तर कार्यक्रमास संचालक मंडळ हायस्कूल नागावचे जगदीश चोरगे, जानवी बनकर, वर्षा पाटील, तनिष्का नाईक, 150 विद्यार्थी विकास रणपिसे आपत्ती सुरक्षा मित्र ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिला मंडळ सदस्य असे 180 नागरिक उपस्थित होते.