| अलिबाग । वार्ताहर ।
नेरळ येथील आदिवासी आश्रम शाळा चाफेवाडी येथे विद्यार्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे जयपाल पाटील यांनी दिले. आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चाफेवाडी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या माननीय प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव संकल्पनेने आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी विकास रणपिसे, डॉ. रमेश बडगुजर, सुरेश दोरे, महेश पाटील, एस .सी .पाटील, शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच 340 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग होता. सदर कार्यक्रमांमध्ये मुलांनी बेचकी, तिरकमटा, याची सुरक्षा, विद्यार्थिनींचे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. सूत्रसंचालन आर. जी कळंभे व आर. आर. शिंदे यांनी केले आभार प्रदर्शन शाळेचे अधीक्षक यांनी केले.







