आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या पुढाकारातून रविवारी (दि.2) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे, हेटवणे कॉलनी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी आनंद जाधव, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पाटील यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले. वन विभागाच्या अधिकार्‍यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, गीते सादर केली. याप्रसंगी गांधीजी व शास्त्रीजी यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Exit mobile version