| श्रीवर्धन | वार्ताहर |
शालेय विद्यार्थ्यांना आपापल्या गावातून शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी भाड्यात 66 टक्के सवलत मिळते. तसेच, बारावीपर्यंत सर्व विद्यार्थिनींना प्रवासी भाड्यात पूर्ण सवलत मिळते. परंतु, हे एसटी पास आणण्यासाठी विद्यार्थ्यांना बस स्थानकावर येऊन रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून श्रीवर्धन एसटी आगाराकडून शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या मार्फत प्रवासी सवलतीचे पासेस वितरित करण्यात येत आहेत. यावेळी वालवटी येथील किसान हायस्कूल येथे स्वतः आगार व्यवस्थापक मेहबूब मणेर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याध्यापक गरंडे यांच्या उपस्थितीत मुलींचे 35 पासेस व मुलांचे सवलतीचे 53 पासेस वाटप करण्यात आले. एस.टी.च्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.