शिवकालीन सरदार जाधवांच्या समाधीचा शोध

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड किल्ल्याचे प्रतिष्ठेचे समजले जाणारे सरनाईक पद लाभलेले जाधव घराण्यातील वीर पुरुष सरनाईक मालजी अतोजी जाधव यांची मौजे धोंडसे या जमिनीमध्ये मातीखाली पूर्णतः दबलेल्या अवस्थेत असलेल्या समाधीचा शोध लागला आहे. दहिसर, मुंबई येथे राहणारे इतिहास संशोधक संदीप मुकुंद परब हे गेली पाच वर्षे समाधी शोधण्याचे काम करीत होते.

सदर समाधी ही जमिनी खाली दबलेल्या अवस्थेत असून समाधीचे उत्खनन होऊन पुढील संशोधनास चालना मिळावी यासाठीही त्यांनी लिहिलेला शोधनिबंध सरनाईक मालजी जाधव यांची मौजे धोंडसे येथील ‘समाधी-एक अभ्यास’ कोकण इतिहास पत्रिकेच्या जानेवारी-मार्च 2023 च्या अंकात प्रकाशित करून इतिहास प्रेमी, अभ्यासक व संशोधक यांच्या समोर त्यांनी मांडला आहे.

सरनाईक मालजी अतोजी जाधव यांनी मौजे धोंडसे यांनी सुधागड जिकंण्याकामी जो पराक्रम केला त्यावेळी त्यांच्या सोबत मौजे तिवरे येथील सरदार हैबतराव देशमुखही होते. या संदर्भातील उल्लेख भोर संस्थांच्या इतिहासात आलेला आहे. तसेच गडावर असलेल्या भोराई देवीच्या मंदिराच्या व्यवस्थेविषयी संपूर्ण जबाबदारी ही त्यांचीच होती. या संदर्भातील ऐतिहासिक पत्र परब यांना शोधण्यात यश मिळाले आहे .

सुधागड किल्ला हस्तगत करण्याकामी केलेला पराक्रम, मौजे धोंडसे गाव इनाम मिळाल्याचे इनामपत्र, गडावरील भोराई देवीच्या मंदिराच्या पत्र, धोंडसे गावात वास्तव्यास असलेले त्यांचे वंशज या सर्वाचा आधार घेऊन सदर समाधी ही त्यांचीच असल्याचे परब यांनी या सर्व बाबींचा आधार घेऊन सिध्द् केले आहे.

Exit mobile version