बूस्टर डोससाठी व्याधी प्रमाणपत्र बंधनकारक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. बूस्टर डोससाठीची प्रक्रिया अगदी आधी सारखीच असेल. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील अंतर 9 महिन्यांपेक्षा (39 आठवडे) जास्त असेल तर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र आहात, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली.

जेव्हा तुम्ही नोंदणी कराल, तेव्हा तुम्हाला काही व्याधी आहेत की नाही हे विचारले जाईल. तुम्ही होय म्हटल्यास तुमची नोंदणी होऊन जाईल आणि लसीकरण केंद्रावर तुम्हाला नोंदणीकृत डॉक्टरांकडून व्याधीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बूस्टर डोस मिळेल, असे डॉ. आर एस शर्मा म्हणाले.

Exit mobile version