पनवेल परिसरात साथआजार वाढले

| पनवेल | वार्ताहर |

सध्या पावसाची रिपरिप तर कधी ऊन सुरु असल्याने वातावरणात वारंवार बदल होत आहेत. त्यामुळे पनवेल परिसरात साथीचे आजार बळावत आहेत. नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांनी देखील डोके वर काढले आहे. कोविड काळात लागलेली टाळेबंदी आणि नागरिकांनी स्वच्छता विषयी घेतलेली काळजी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आलेली भर यामुळे पनवेल परिसरात कोरोना व्यतिरिक्त साथीचे आजार रुग्ण कमी झाले होते. परंतु, मागील वर्षीपासून पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यावर्षी हवामानात होणाऱ्या बदलामुळे पनवेल परिसरात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या आजारांवर खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रुग्णांची संख्या वाढ होत चालली आहे. डेंगू खालोखाल गॅस्ट्रोच्या रुग्णांत देखील वाढ होताना दिसत आहे. यावर्षी गॅस्ट्रो रुग्णांमध्ये मागील वर्षी पेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे.

Exit mobile version