दिशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता माणगावात

। माणगाव । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील आग्रगण्य कॉम्प्युटर ट्रेनिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिशा कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता माणगावात सुरु झाले आहे. या इन्स्टिट्यूटचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.27) अँड. राजीव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शेखर देशमुख, नितीन बामगुडे, गजानन मोरे, दिपक शेलार, राहुल मोरे, शेखर जाधव, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका स्नेहल संदीप काकडेंसह संस्थापिका नेहा प्रसाद यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांना इन्स्टिट्यूटबद्दलची माहिती दिली. यावेळी अँड. राजीव साबळे व जेष्ठ नेते शेखरशेठ देशमुख यांनी संस्थेला खास शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version