डोंबिवलीत चर्चेचा विषय
| पाली | वार्ताहर |
डोंबिवलीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिनिधित्व असले तरी शहराच्या विकासकामांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याबद्दल संघ परिवारामध्ये असंतोष वाढल्याचे दिसून येत आहे.
संघ परिवाराच्या अनेक कार्यकर्त्यांनी, चव्हाण यांनी डोंबिवलीत कोणतेही ठोस विकासात्मक पाऊल उचलले नसल्याची टीका केली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळं संघ परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर निलेश काळे यांच्या उमेदवारी अर्जाने संघ परिवारामध्ये उत्साहाचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र डोंबिवलीत दिसत आहे. डोंबिवलीत गेल्या पंधरा वर्षांत अपेक्षित विकास न झाल्याने संघ परिवारामधील कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे जाणवू लागली आहे. येत्या निवडणुकीत या नाराजीचा परिणाम दिसून येण्याची शक्यता असून, काळे यांच्या उमेदवारीमुळे डोंबिवलीच्या राजकीय वातावरणात मोठे परिवर्तन घडण्याची चिन्हे आहेत.
डोंबिवलीतील हा बदलता राजकीय पायंडा संघ परिवारासाठी नव्या आव्हानांचा आणि संधींचा कालखंड ठरू शकतो, हे निश्चित. आगामी काळात या चर्चेला कोणते स्वरूप येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







