जप्त केलेल्या 41 लाखांचा गांजाची विल्हेवाट; 9 पोलिस ठाण्यातील 7 गुन्ह्यांत केला होता जप्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील 9 पोलिस ठाण्यांमध्ये विविध प्रकरणात दाखल असलेल्या 7 गुन्हयांमध्ये जप्त करण्यात आलेला 41 लाख रुपयांचा 131 किलो 330 ग्रॅम वजनाचा गांजाची कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करुन रायगड पोलिसांनी विल्हेवाट लावत नाश करण्याची कारवाई केली.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील पेण, खालापुर, पाली, नागोठणे, खोपोली या 09 पोलीस ठाण्यातील नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅन्ड सायकोट्रॉपीक सबस्टेन्सेस अ‍ॅक्ट (एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट) अन्वये दाखल असलेल्या 07 गुन्हयांमध्ये 131 किलो 330 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. एन.डी.पी. अ‍ॅक्ट कलम 52 अ (2) प्रमाणे कार्यवाही करून पोलीस अधीक्षक अशोक दुधे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय (गृह) जगदीश काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या समितीच्या देखरेखीखाली न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा संचलनालय, कलीना, सहा. रासायनिक विश्‍लेषक अ.स.गावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगडचे क्षेत्र अधिकारी उत्तम माने, वैद्यमापन शास्त्र अलिबाग, विभाग रायगडचे निरीक्षक बाळु भिमराव चव्हाण व दोन शासकीय पंच यांच्या उपस्थितीत एकुण 131 किलो 330 ग्रॅम वजनाचा किंमत 41 लाख 52 हजार 434 रुपये किंमतीचा गांजा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड (चथचङ) एम.आय.डी.सी. तळोजा, ता.पनवेल, जि. रायगड या ठिकाणी योग्य कायदेशीर प्रकीया पुर्ण करुन नाश करण्यात आला.
सदर प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय (गृह) जगदीश काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार परेश म्हात्रे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी/कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version