शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन झाल्यानंतर महायुतीला आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितद पवार गट) यांच्या मंत्र्यांची यादी दिल्लीतून निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धाकधूक वाढली आहे. परंतु, शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदारांनी सहा जणांना मंत्रिपद देण्यास विरोध केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतच धुसफूस असल्याचे समोर आले आहे.

माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळू शकते. परंतु, याच सहा नेत्यांच्या नावाला शिवसेनेतील आमदारांकडूनच विरोध होत आहे. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्‍वासने देतात. प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात, अशी माहिती समोर येत आहे. तसेच, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाला देखील शिवसेनेसह भाजप आमदारांचाही विरोध असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version