। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिझनेस फोरमतर्फे पाचशे कीटचे वाटप करण्यात आले. ह्यामध्ये झाडू, फिनेल बॉटल, डस्टपॅन, दोरी, लादी साफ करण्याचे वायफर, डस्टर, कीशी, पाय खराब होऊ नये म्हणून मलम, ब्लिचिंग पावडर इ. साहित्याचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारचे कीट वाटप केल्यामुळे समाजातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. सदरचे सर्व साहित्य उद्योजक प्रकाश देशमुख यांच्या हॉटेल अतिथीमध्ये एकत्र करून कीट बनवण्यात आले व तेथूनच सर्व ठीकाणी वाटप करण्यात आले. यामध्ये मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, कार्यकारी अध्यक्ष अरुण पवार, मुंबईहून समाजाचे पदाधिकारी प्रसाद कदम, राजेंद्र तावडे, ऋषीकेश तावडे तसेच चिपळूणचे प्रकाशराव देशमुख, संतोष सावंत देसाई, मनिष सुर्वे, श्रीपाद चव्हाण, राधेय शिंदे, शैलेश शिंदे, शर्मिला गांधी, प्रसाद शिर्के, सुबोध सावंत देसाई आदी पदाधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.