बशिर हजवानी ट्रस्ट मार्फत रुग्णवाहिकांचे वाटप

। महाड । प्रतिनिधी ।
बशिर एम हजवानी फांऊडेशनच्या वतीने अत्याधुनिक सात रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा महाड मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहा मध्ये नुकताच आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, आ.भरत गोगावले, दापोलीचे आ.योगेश कदम, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामप आदी मान्यवर उपस्थित होते. बशिर एम हजवानी फांऊडेशनच्या वतीने रुग्णवाहीका लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी हजवानी फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशिर हजवानी होते. त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते अलि कौचाली, इकबालश चांदले, अकबर तरे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्या संस्थांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत त्यांनी त्याचा विनीयोग चांगल्या प्रकारे करावा असा सल्ला हजवानी यांनी दिली. या रुग्णवाहीका जनतेच्या आरोग्याची आणि हजवानी यांच्या दातृत्वाची चावी असल्याचे सांगताना महापुराच्या काळामध्ये मुस्लिम समाजाकडून कोणताही भेदभाव जात पात धर्म न पाळता मदत केली ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेम असणार्‍या सेक्युलॅरिझमचे प्रतिक असल्याचे खा. सुनिल तटकरे म्हणाले.

Exit mobile version