रसायनी येथे विविध योजनांच्या लाभांचे वाटप

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत कमिटीची मुदत 14 फेब्रुवारी 2024 रोजी संपत असल्याने कर्तव्यदक्ष सरपंच गौरीताई महादेव गडगे व सदस्य कमिटीच्यावतीने वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विविध योजनांच्या वैयक्तिक लाभांचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका असावी, स्वच्छतेवर भर देत कुठेही कचरा राहू नये यासाठी घंटागाडी तसेच ग्रामपंचायत कर्मचा-यांना परिसरातील नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक़ची व्यवस्था करून अनावरण करण्यात आले. सरपंच गौरीताई महादेव गडगे आणि सदस्यांच्या प्रयत्नातून 15 टक्के मागासवर्गीय निधीतून शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र असलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. मागासवर्गींय /आदिवासी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. दहा टक्के महिला बालकल्याण निधितून महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप, याच बरोबर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व राजिप शाळा, अंगणवाड्या डिजिटल करुन ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल स्क्रिन बसविण्यात आले. मागासवर्गींय युवकांना बॅन्जो साहित्य, मागासवर्गीय कुटूंबाना सौर कुकर, भजनी मंडळाला साऊंड साऊंडसिस्टसह इतर साहित्य पुरविणे, अंगणवाड्यात पोषण आहारासाठी भांडी पुरविणे, गरोदर स्तनदा मातांना पोषण आहार पुरविणे, अपंग लाभार्थ्यांना सौर युनिट पुरवठा करणे, ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी उपक्रम सरपंच गौरीताई गडगे व सदस्य यांच्याहस्ते ग्रामपंचायत कमिटी मुदतीच्या शेवटच्या दिवशी पार पडले.

यावेळी सरपंच गौरी गडगे, उपसरपंच सुजाता पाटील, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार, संदेश मालकर, कल्पना ठोंबरे, महादेव गडगे, चंद्रकला वाघमारे, सरिता गडगे, शिवाजी शिंदे, वर्षा पाटील, राजेश पाटील, योगिता भोईंर, निता पाटील, जयश्री पाटील, हरेश पाटील, नंदकुमार पाटील, मुख्याध्यापक राठोड सर, इ.के.सोनावणे सर, एकनाथ पाटील, परशुराम जोशी, शंकर मालकर, दामू गायकर, प्रकाश जगे, बाळू शिंदे, नामदेव ठोंबरे, कृष्णा पाटील, रामदास पारंगे, दशरथ पाटील, दामू पवार, संतोष पाटील, रिदान पाटील, संदिप शिंदे, राजेश साळुंखे, जनार्दंन बावदाने, रामचंद्र मुकणे, राम पारधी, ज्ञाधेश्वर म्हात्रे, अनंता जाधव, अंकूश पाटील, महेंद्र म्हस्कर, किरण मालकर, संतोष हिंदोळा, शरद शिर्के, जयप्रकाश पाटील, सुनिल पाटील, अनिकेत पारंगे आदीसह ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग, अंगणवाडी सेविका, आशावर्कंर, विद्यार्थी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी सरपंच गौरीताई गडगे आणि सदस्य कमिटीला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version