| रेवदंडा | प्रतिनिधी |
सायकल वाटप मदत नव्हे कर्तव्य म्हणून करते, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. साळाव येथे सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सावित्रीच्या लेकींनो शिका, मोठे व्हा पण गाव व शाळा यांना विसरू नका असे आवाहन केले.
साळाव येथील श्री मारूती मंदिराचे प्रांगणात साळाव विभाग शेकाप वतीने शनिवार सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप चित्रलेखा पाटील यांच्या सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या उपक्रमातून करण्यात आले. यावेळी शेकाप नेते संदीप घरत, मुरूड तालुका चिटणीस अजित कासार, सहचिटणीस सी.एम. ठाकूर, अलिबाग तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, साळाव माजी उपसरपंच मधुशेठ पाटील, बोर्ली सरपंच डॉ. चेतन जावसेन, उसरोली सरपंच मनिष नागावकर, वळके उपसरपंच विजय म्हात्रे, मुरूड तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष शरद चवरकर, साळाव ग्रा.प. सरपंच निलम पाटील, नागाव ग्रा.प.सदस्य हर्षदा मयेकर, आदेश पाटील, मयुर पाटील, शरद वरसोलकर, सुरेश खोत आदी शेकापक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील व मान्यवराचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन करण्यात आले. साळाव शेकापक्षाचे वतीने माजी उपसरपंच मधुशेठ पाटील यांच्या हस्ते चित्रलेखा पाटील यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर मंडळीचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी साळाव ग्रा.प. सरपंच निलम पाटील, निडी ग्रामस्थ, साळाव ग्रामस्थ, साळाव विदयार्थीनी, मुरूड चर्त्मकार संघटना, यांचे वतीने चित्रलेखा पाटील यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला.
साळाव ग्रा.प. हद्दीतील 43 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. अजित कासार, संदीप घरत, आदेश पाटील आदींनी चित्रलेखा पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन गौरवोद्गार काढले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोर गायकर, आदेश पाटील, भालचंद्र साळावकर, दिपिका पाटील, हेमा साळावकर, आज्ञेश पाटील, भास्कर साळावकर, आदिनाथ सानेकर, गणेश जाधव, शंकर पाटील, रूपेश पाटील, कृष्णा शेळके, अनिल बापलेकर आदीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंलचन कारखानीस यांनी केले.