बेलकडे येथे सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप

चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।

सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या अभियानांतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून बेलकडे येथे नुकतेच सायकलींचे वाटप करण्यात आले. बेलकडे येथे गणेश मंदिराच्या 20 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून ङ्गसावित्रीच्या लेकी चालल्या पुढेफ या उपक्रमांतर्गत गरजू मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमा करिता माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, बेलकडेचे सरपंच संजय पाटील, उपसरपंच प्रणिता पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, दर्शना पाटील, शितल पाटील, शेखर पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील, शेकाप आरोग्य सेलचे प्रमुख रूपेश पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या वतीने पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, अक्षय डिकले, नितिन जानकर उपस्थित होते त्याच प्रमाणे इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.



सायकल वाटप कार्यक्रमा निमित्त मार्गदर्शन करतांना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी संगितले की, चित्रलेखा पाटील यांचे कार्य अनमोल आहे, सायकल वाटपाचा हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कोरोना, चक्रीवादळाच्या काळात केलेले काम कोणीही विसरू शकत नाही. आमदार भाई जयंत पाटील यांच्या माध्यमातून आजवर गावोगावी भरपूर विकास कामे करण्यात आलेली आहेत, शेकाप दिलेला शब्द पूर्ण करून दाखवतो याचा आम्हाला कार्यकर्ता म्हणून कायम अभिमान आहे. तर जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक यांनी चित्रलेखा पाटील यांच्या वतीने मार्गदर्शन करताना संगितले की ङ्गसावित्रीच्या लेकी चालल्या पुढेफ या उपक्रमांतर्गत चित्रलेखा पाटील यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. ताईंनी मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण लक्षात घेवून, शिक्षणाला गती देण्याच्या उद्देशाने खेडोपाड्यात गरजू मुलींना सायकलींचे वाटप सुरू केले. बघता बघता छोटेसे लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. आतापर्यंत ताईंच्या माध्यमातून 16800 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे आणि लवकरचं 1 लाख सायकल वाटप संकल्प त्या पूर्ण करतील हा आम्हाला विश्‍वास आहे असे अमोल नाईक यांनी संगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी सरपंच संतोष पाटील यांनी केले.

Exit mobile version