आदिवासीवाड्यात ब्लँकेटचे वाटप

| रसायनी | वार्ताहर |

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे व पिल्लेज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोहोपाडा रसायनीतर्फे रसायनी पाताळगंगा परिसरातील माजगाव आदिवासीवाडी व उंबरमाळ आदिवासीवाडीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत ब्लँकेट वाटप व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कॅन्सर जनजागृती म्हणून शिबीर भरवण्यात आले होते. यावेळी अरुण गोविंद जाधव, निलेश जाधव, कलावती उपाध्याय, डॉ. ऐश्‍वर्या मुरली, गौतम कांबळे, शांताराम जाधव म्हात्रे, हर्ष, कृष्णा वैष्णवी आदी उपस्थित होते.

Exit mobile version