। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच तीर्था श्रमिक माथाडी व जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल रेल्वे स्थानक व पनवेल बसस्थानक परिसरातील थंडीचा सामना करणाऱ्या गरीब, निराधार आणि उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. वाढत्या थंडीपासून संरक्षण मिळावे आणि सर्वांना माणुसकीची ऊब मिळावी, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे समजते. संस्थेचा हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून, यावर्षीही सेवाभाव, सामाजिक जाणीव आणि सामूहिक सहभागाच्या जोरावर हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाला. यावेळी अरुण जाधव, अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तथा तीर्था श्रमिक माथाडी व जनरल कामगार संघटना, यांनी स्वतः उपस्थित राहून उपक्रमाचे मार्गदर्शन केले. तर मनोज महाडिक, रेश्मा कुरुप (सामाजिक कार्यकर्त्या- पनवेल), सुनील कुरुप, रोहित इंगळे, शीतल आंबेरकर तसेच इतर मान्यवर महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाला बळकटी दिली.
गरीब, निराधारांना ब्लँकेट वाटप
