दी लाईफ फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

| सोगांव | वार्ताहर |

दी लाईफ फाऊंडेशनतर्फे अलिबाग तालुक्यातील प्राथमिक, उच्चमाध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम वरसोली ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक एकुण 82 शाळांना व त्यातील सुमारे 5113 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या या प्रमाणे एकूण 25565 वह्यांचा संच देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पूनिता गुरव, अलिबाग तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, अक्षय पाटील, तसेच तालुक्यातील विविध रा. जि. प. शाळांचे केंद्रप्रमुख, 82 शाळांच्या मुख्याध्यापक उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, प्रणय ओव्हाळ, राखी राणे, भीमराव तांबे , प्रसाद कांबळे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version