| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या शाळेत गरीब, गरजू आणि आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी व्हवा या उद्देशाने वह्या वाटप करण्यात आले. माजी आ. मनोहर भोई यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी माजी जि.प. सदस्य मोतिराम ठोंबरे, चौक विभागप्रमुख सुधीर ठोंबरे, ठाकूर गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. अमित मिडगुले यांनी सूत्रसंचालन, तर शुभांगी मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.