आदिवासींना जातीच्या दाखल्यांचे वाटप

| उरण | वार्ताहर |

उरण सामजिक संस्था व महसूल विभाग पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.04) साई तालुका पनवेल येथील कातकरी वाडीवरील सर्व आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार पनवेल विजय पाटील, अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील व अ‍ॅड. सिध्दार्थ इंगळे उपस्थित होते.

दरम्यान, आदिवासी समाजातील सर्व घटकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्याचे आश्‍वासन तहसीलदार पनवेल विजय पाटील यांनी दिले. अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा राजेंद्र मढवी, उपाध्यक्ष उरण सामजिक संस्था यांनी घरकुल योजना व रेशन कार्ड बनविण्यासाठी लवकरच कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. आदिवासी सेवक रत्नाकर घरत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडल अधिकारी कर्नाळा मनोज मोरे, मंडळ अधिकारी संतोष पाटील, तलाठी लतिका जाधव, चिरनेर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक मोरे सर, साई आश्रमशाळेतील शिक्षक व आदिवासी निरीक्षक पांढरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सुनील जोशी, मनीष कातकरी, रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी सर्व आदिवासी बांधवांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास अ‍ॅड. अक्षय गवळी, नितीन पगारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आदिवासी कार्यकर्ते अनंता वाघमारे व कृष्णा पवार, ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.

Exit mobile version