जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दाखले वाटप

। माणगाव । प्रतिनिधी ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदी कर्मयोगी अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडीत बुधवार (दि.17) रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना 15 आयुष्यमान भारत कार्ड, 27 जातीचे दाखले, 15 जिवंत सातबारा, 20 आभाकार्ड असे विविध योजनांचे 77 दाखले जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या उपक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तहसीलदार दशरथ काळे, गट विकास अधिकारी शुभदा पाटील, निवासी नायब तहसीलदार विपुल ढुमे, मंडळ अधिकारी अर्जुन जमखंडी, तासगाव तलाठी मारुती चाटे, निजामपूर तलाठी भोजरंगे, कौशल वाघमारे, योगेश शिर्के, घाडगे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version