। आंबेत । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील कोळे आदी आदिवासी वाडीवर कातकरी उत्थान अभियान अंतर्गत अनेक दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी कातकरी उत्थान योजनाराबविण्यात आली आहे. या योजनेमुळे कोकण विभागासह इतर विभागातील कातकरी समाजाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तत्काळ लाभ मिळणार आहे. याच उद्देशाने लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजस्व अभियान राबविणेबाबत निर्देश देखील दिलेले आहेत,याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविला जातोय यावेळी मंडळ अधिकारी श्री सलीम शहा, तलाठी संदीप सोरेपोलीस पाटील महेंद्र विचारे यांसह गाव वाडीवरील अध्यक्ष , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते