। अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य विकास उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड सहाण अलिबाग या ठिकाणी मंगळवारी (दि.16) इलेक्ट्रिकल टेकनिशियन, ब्युटी कल्चर हेल्थ केअर व सेल्फ एम्प्लॉईड टेलर व्यवसाय प्रशिक्षण कोर्सच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ.नितीन गांधी, अॅड. नीला तुळपुळे बोर्ड मेंबर, विजय कोकणे संचालक व ग्रामपंचायत सहाणचे उपसरपंच नरेश वर्तक या मान्यवरांच्या उपस्थितीत व ब्युटी कल्चर हेल्थ केअर कोर्स प्रशिक्षिका-पूजा गायकवाड, जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतिक्षा चव्हाण अकाउंट मॅनेजर, सुकन्या नांदगावकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व इलेक्ट्रिकल टेकनिशियन, ब्युटी कल्चर हेल्थ केअर व सेल्फ एम्प्लॉईड टेलरचे प्रशिक्षणार्थीं यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप पार पडला. यावेळी उपस्थितांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी केले.