अर्थसहाय्य योजनेतून लाभार्थ्यांना धनादेश वाटप

। माणगाव । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण अर्थसहाय्य योजनेतून आ. भरत गोगवले यांच्याहस्ते माणगाव तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी शुक्रवारी (दि.8) प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार बी.वाय.भाबड, निजामपूरचे शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसाद गुरव आदी उपस्थित होते.
शासनाच्या कुटुंब कल्याण अर्थसहाय्य योजनेतून महाड विधानसभा मतदार संघातील माणगाव तालुक्यातील कुंभार्ते येथील लाभार्थी सरिता किसन उतेकर, रेपोली येथील लाभार्थी अनिता गोविंद सोंडकर, निजामपूर येथील लाभार्थी सुनीता संदीप दोशी यांना प्रत्येकी 20 हजार रुपयाचे धनादेश आ.भरत गोगावले यांच्याहस्ते देण्यात आले.

Exit mobile version