पनवेलमध्ये लाभार्थ्यांना धनादेश वाटप


। पनवेल । वार्ताहर ।
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाखाली राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील कर्ता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी वीस हजार रूपये इतके शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुक्यातील गुलाब कातकरी रा. चेरवली, सरोजा माने रा.वावेघर, कल्पना वाघमारे रा. तक्का पनवेल, बामी दोरे रा. मालडुंगे, मंगला यशवंत वाघे रा. नेरे पाडा यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची मदत पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते देण्यात आली. संबंधीत लाभार्थ्याना धनादेशाचे वाटप तहसीलदार कार्यालयात करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार एकनाथ नाईक, निवासी नायब तहसीलदार संजिव मांडे, संगायो शाखेतील कर्मचारी व लाभ देण्यात आलेल्या व्यक्तींच्या गावातील संबधीत तलाठी उपस्थित होते.

Exit mobile version