। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील डांगरणेश्वर वाडी, मोर्बे येथे आदिवासी बांधवांसाठी कपडे व अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू आदिवासी कुटुंबांना आवश्यक वस्तूंची मदत करणे हा होता. क्लबच्या सदस्यांनी एकत्र येऊन कपडे, धान्य तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वितरण केले. या प्रकल्पात आदिवासी महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्व लाभार्थ्यांनी आनंदाने व कृतज्ञतेने साहित्य स्वीकारले. या उपक्रमात रो.पुरणसिंग मेहरा यांनी विशेष सहकार्य करत मुलांसाठी ड्रॉइंग बुक्स, गोष्टींची पुस्तके, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर व इतर स्टेशनरी वस्तू भेट दिल्या. या भेटवस्तू मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. क्लबच्या सर्व सदस्यांनी नियोजन, साहित्य वितरण आणि व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा प्रकल्प यशस्वीपणे पार पडला आणि रोटरीच्या Service Above Self या ब्रीदवाक्याला साजेसा ठरला. यावेळी सुनीता चौधरी, श्वेता खेडवाल, मुकुंद चौधरी, पुरणसिंग मेहरा उपस्थित होते.
आदिवासी बांधवांना कपडे, अन्नधान्य वाटप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606