श्रीवर्धनमध्ये कुबडी संचाचे वाटप

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
लीला म्हात्रे प्रतिष्ठान मुंबई आणि एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन यांच्या सहकार्याने मोफत मोडिफाइड कुबडी संच व व्यवसाय अनुदान वाटप कार्यक्रम नगरपरिषद शाळा क्र.1 श्रीवर्धन येथे दि.15 मे रोजी घेण्यात आला. सदर कार्यक्रमास तहसीलदार सचिन गोसावी निशांत डी. म्हात्रे, रमेश ओवलेकर, संजय पाटील यांनी उपस्थित दिव्यांगाना मार्गदर्शन केले. दोन कुबड़यांवर चालणार्‍या दिव्यांग व्यक्तीने स्वावलंबी व्ह्यवे यासाठी 4 दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 4000 रु व्यवसाय अनुदान देण्यात आले. यावेळी निलेश नाक्ती, मुईद सरखोत, उदय माळी, नाझनीन करवेकर, संतोष पारधी, सुनील गायकर, हेमंत वाघे, समीर रिसवुड, संदीप लाड, राजा टाकले, समद सैफुले, अरशद काजी हे उपस्थित होते.

Exit mobile version