। रेवदंडा । वार्ताहर ।
दिव्यांगना धनादेश वाटप कार्यक्रम कोर्लई ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. कोर्लई ग्रामपंचायत सरपंच प्रशांत मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमांस उपसरपंच लिना सिमोन वेगस, ग्रा.प.सदस्या प्राची म्हात्रे, ग्रा.प.सदस्या मरिना मोरीस मार्तीस, ग्रा.प.सदस्य दशरथ पैतरी, ग्रा.प.सदस्य प्रशांत भोय व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीसह कोर्लई ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व्यक्तीची उपस्थिती होती.
कोर्लई ग्रामपंचायत सरपंच प्रशांत मिसाळ यांच्या हस्ते दिव्यांगना धनादेश वाटप कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्तीना धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या फंड निधीतून दिव्यांग व्यक्तीना धनादेश निधीचे वाटप करण्यात आले असल्याचे कोर्लई ग्रामसेवक यांनी सांगितले.






