परी फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

उन्हाळी सुट्टीनंतर जून महिना आला की वेध लागतात ते शाळेचे. कधी एकदा 15 जून येतो आणि शाळेत जाऊन आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून सुट्टीतील गंमती जमती सांगतो असे विद्यार्थ्यांना वाटत असते. दुकानात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झालेली दिसून येते. परंतु, भाले शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र वह्या पुस्तके, दप्तर, कंपास, पेन, छत्री, बूट-मोजे, गणवेश सगळं काही शाळेतच मिळते. विविध शासकीय योजना, आजी माजी विद्यार्थी, समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांचेमार्फत शैक्षणिक साहित्यांची जुळवाजुळव या शाळेची व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवृंद दरवर्षी करताना दिसून येतात.

यावर्षी डोंबिवली येथील प्रसिद्ध उद्योजक व परी फाउंडेशनचे राजेश ढोकरे यांच्यातर्फे स्कूल बॅग आणि छत्र्या तसेच, कलर किट असे सुमारे सत्तर हजाराचे साहित्य शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत भेट देण्यात आले. यावेळी राजेश ढोकरे व त्यांची कन्या परी तसेच सरपंच दत्ताअण्णा खांबे, सदस्या अस्मिता चाळके, सुरेखाताई कुपल, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकवर्ग, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version