। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा पारिषद आदर्श शाळा नवघर येथील विद्यार्थ्यांना दत्तात्रेय वांजले यांच्यावतीने शनिवार (दि.6) रोजी वह्या व पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार यांच्या प्रयत्नाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात रा. जि. प. शाळा नवघर येथील मंथन स्पर्धेला बसणार्या 18 विद्यार्थ्यांची परीक्षा फी अनिल बंसारी यांच्याकडून मिळवून देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बहुमूल्य मदत केली.
कार्यक्रमासाठी सरपंच माई चव्हाण, उपसरपंच संजय मोरे, माजी सभापती रमेश सुतार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, निलेश जाधव, अर्पिता सुतार, संचिता तोंडे, सविता शिर्के, अश्विनी वाघमारे, संगीता बैकर, वृषाली गुरव, शीतल पाटील, अनुजा माने व अंकिता जाधव, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल राणे यांनी आभार मानले.