| उरण | वार्ताहर |
वनवासी कल्याण आश्रम उरण तालुक्याच्यावतीने रविवारी (दि. 7) अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर, उरण येथील वाडीवरील विद्यार्थांसाठी मोफत वह्यावाटप, शालोपयोगी वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांच्या मागे वनवासी कल्याण आश्रम सदैव पाठीशी उभी आहे. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा ,काही अडचणी असतील तर आमच्या वाडीवरील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणा, आम्ही सारे मिळून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे उरण तालुका सहसचिव कुणाल सिसोदिया यांनी सांगितले. वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात राहूनही आपल्याला शिकता येईल, असेही ते म्हणाले. वाडीवरिल 35 मुलांना वह्या वाटप आणि 50 भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या.
उरणमधील दानशूर व्यक्तीमत्व जितेंद्र परमार यांच्यावतीने वह्या देण्यात आल्या तर, उरण केगावमधील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा अधिकारी आणि जितेंद्र जैन यांच्यावतीने उपस्थितांना साडी, कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी चिरनेर ग्रामपंचायत सदस्य दीपक कातकरी, वनवासी कल्याण आश्रम जिल्हा हितरक्षा प्रमुख श्रीमती मीराताई पाटील आणि संजय दाते आदी मान्यवर उपस्थित होते.