शैक्षणिक साहित्याचे वाटप

| नेरळ | प्रतिनिधी |

हिंदू लोहार समाज महासंघ मुंबई व महाराष्ट्र आणि अंध अपंग सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जुम्मा पट्टी येथील डोंगराळ दुर्गम भागातील रायगड जिल्हा परिषद आदिवासी शाळेत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होते. अंध अपंग संस्था व हिंदू लोहार समाज महासंघ यांच्यावतीने वायफाय सेवा पूर्ववत करुन दिले आहे. त्याच प्रमाणे शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

यावेळी आण्णा जोशी, रामनाथ मोरे, बळीराम खरे, दिलीप जोशी, अरुण जोशी, मंगेश कदम, सुनील राजे, मुख्याध्यापिका छाया चव्हाण, स्मिता म्हात्रे, गीता पाटील, वैशाली ढोले उपस्थित होते.

Exit mobile version