भागूचीवाडीत शैक्षणिक साहित्याचे वाटप

। नेरळ । वार्ताहर ।
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी संस्था नालासोपारा या संस्थेने जिल्हा परिषद शाळा भागूचीवाडी येथील 65 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेऊन मनोरंजन केले व खाऊ वाटप करण्यात आला. सामाजिक बांधीलकी संस्था ही मागील दोन वर्षांपासून कर्जत तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आह.े तसेच निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळांना मदत करणे धान्यवाटप असे उपक्रम संस्थेने राबविले आहेत. या कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर, शेखर पेणकर, सुनील इंदप,वंदना खाडे, डायना लोबो,ओमकार ढेखले, मुकुंद आचारेकर, संतोष खेड़ेकर, अनिल मोरे, हरीचंद्र आढारी तसेच शाळाव्यावस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version