गौलवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

रा.जि.प.चरई गौलवाडी आदिवासीवाडी शाळेत रविवारी (दि.18) धान्य व शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. राधिका बंक, समीर नवघरे, रिमा रवी, जितेंद्र पटेल, डॉ. जतीन कोठारी, डॉ. सचिन अलमेला, रमेश गाला, धीरज गाला, भगवान पटेल, किशोर शाह, हंसा अरविंद पटेल, विनित शाह, कल्पेश आर. शाह, समीर नवघरे, डॉ. फुलरेनू, शोभा अशोक बंका, भाविका अश्विन ओरा, रिमा रवी आदी मान्यवर उपस्थित होते.

शंभर कुटुंबांना धान्य किट वाटप करण्यात आले. तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक जगदीश कासे, उपशिक्षीका कल्याणी वाजे व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी कडून सर्व दातांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version