पनवेल तालुकामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने बुधवार दि. 15 जून रोजी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे आणि शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील सक्रीय पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणार्‍या मंचाने यापूर्वी देखील सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे आणि छत्री यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. मंचाच्यावतीने मुलांना छोट्या वह्या,मोठ्या वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.तसेच छत्र्या देण्यात आल्या. यावेळी माधव पाटील, मंदार दोंदे, नितीन कोळी, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, राजू गाडे, भरतकुमार कांबळे, साजन फुलोरे, हनुमान फुलोरे, धनंजय पाटील, समृद्धी पाटील, प्रकाश राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version