शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

| सुधागड-पाली | वार्ताहर |

पाच्छापूर पंचक्रोशीतील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवारी, (दि. 7) करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राकेश रामू महाडिक, राजेंद्र महाडिक, शरद महाडिक यांच्या सौजन्याने, बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर यांच्यामार्फत दिवंगत रामू बाबू महाडिक, मंगला उत्तम शेलार (आदर्श शिक्षिका जि.प. शाळा महाड), उमेश महाडिक, शकुंतला महाडिक यांचे स्मरणार्थ पाच्छापूर पंचक्रोशीतील पाच शाळेतील एकूण 421 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 1000/- रु. शिष्यवृत्ती देऊन गुणगौरव सत्कार, तसेच पर्यावरण जपण्याकरिता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक, सचिव राकेश महाडिक, उपाध्यक्ष मधुकर महाडिक, सचिव सुरेंद्र महाडिक, पत्रकार सिद्धांत गायकवाड, संदीप डिंगळे, रोहित महाडिक, विनीत महाडिक, स्वदेश फाऊंडेशनचे श्रीधर कोकरे, सुनील खांबे, सुजाता महाडिक, पाच्छापूर पंचक्रोशितील ग्रामस्थ व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, तसेच पाचही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, माध्यमिक शाळा पाच्छापूर शाळेचे मुख्याध्यापक दिपक माळी, सुचिर खाडे, नारायण वारा, दिव्या जंगम, दर्यागाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक धर्मा तांडेल, राजू बंगारे, आसानवाडी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बंगारे, चौबे, गौळमालधनगरवाडा जि.प. शाळेचे मुख्यध्यापक नरेंद्र कोकाटे उपस्थित होते.

Exit mobile version