लायन्स क्लबच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा व लायन माधव आग्री यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जय भवानी मित्र मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ मुठवली खुर्द यांच्या सहकार्यातून रोहा तालुक्यातील मुठवली खुर्द येथे 3 ऑक्टोबर रोजी इयत्ता दहावी, बारावी, व पदविधर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ सागर सानप, रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक अभिजित ठाकरे, पराग फुकणे, डॉ श्याम लोखंडे, रवींद्र लोखंडे, माधव आग्री, गजानन बामणे, अनिल महाडिक अलंकार खांडेकर, नंदकुमार कळमकर, राजेंदर कोप्पू, महेश तुपकर, विश्‍वास निकम, योगेश शिंदे, सतीश ठाकूर, मारुती तुपकर, चंद्रकांत शेळके, नरेश गायकर, येणाजी शिंदे, श्याम सावंत, पोलीस पाटील राम सावंत, यांच्यासह मान्यवर उपस्थित तसेच आदी विद्यार्थी व ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version