विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

। सोगांव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील कुंट्याची गोठी-वढाव खुर्द राजिप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांनी स्वखर्चाने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले.

सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बामणगाव येथील प्रतिक खारकर हे एक दानशूर व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मराठी शाळेला वेळोवेळी अनेक प्रकारची मदत केली आहे. शाळेतील मुलांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व उन्हाळी सुट्टी आनंदात जावी यासाठी चित्रकलेचे साहित्य वह्या, पेन, पेन्सिल, कलरबॉक्स आदी शालेय शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले. याप्रसंगी जि.प.मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version