। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवारी (दि.15) शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू व मराठी शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे दोन्ही शाळेच्या शिक्षक वर्गांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला सुनिल थळे, चांदोरकर, समद कुर, अनिल जाधव, चंद्रकांत खोत, सानिका घाडी, लाईक कप्तान, किशोर सातमकर, नितीन अधिकारी, स्मिता राऊत, सुरेश राऊत, राजू पडते, सतिश घाडी, सचिन घाडी, सूचित थळे, शैलेश तिर्लोटकर, मुनावर कुर, तसेच ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.