विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश जैन यांच्यातर्फे माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा देगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना बुधवारी (दि.19) रेनकोट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रकाश जैन हे समाजात सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेऊन काम करीत असतात. बहुजन समाजातील गोरगरीब जनतेला व गरजू विध्यार्थ्यांना नेहमीच आपल्या परीने मदतीचा हात देत असतात. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना विध्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय नजरेसमोर ठेऊन जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सांगत गरीब गरजू विध्यार्थ्यांना आपण सतत आपल्यापरीने मदतीचा हात देऊ, असे आश्वासित केले. यावेळी प्रकाश जैन यांनी देगाव शाळेतील विध्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने त्यांचे देगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच सुषमा वाघमारे, दिनेश गुगले यांनी विशेष ऋण व आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सुषमा वाघमारे, दिनेश गुगळे, ऊर्मिला मोरे, शंकर शिंदे, प्रतिक्षा अंबुर्ले, वैष्णवी मर्चंडे, समिक्षा दिवेकर, पालक वर्ग व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version