विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

श्रीमती इन्दुमती वसंतलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये गो शाळा चालवणे, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवले जातात. यंदा दरवर्षीप्रमाणे पिटसई येथील अशोक ल. लोखंडे विद्यामंदिरातील इयत्ता पाचवी ते दहावीमधील शालेय विद्यार्थ्यांना टी-शर्ट, टोपी, तसेच वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टकडून साहित्य विद्यालयास मिळवून देण्याकरिता ट्रस्टचे समन्वयक गणेशजी सावंत व रसिका पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी निलेश थोरे, अमोल पवार, रितेश मुंढे, शाळेचे चे. रमन खेळू वाजे, सचिव संजय रेडीज, परेश चांगले, स्वप्नील साळवी, राकेश जाधव, सुयोग बारटक्के, मुख्याध्यापक संतोष रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version