विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब खालापूरच्या माध्यमातून अनेक उपपक्रम राबवित असताना, जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून वडवळ येथील माध्यमिक शाळेतील आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, छत्री, प्राथमिक उपचार किट व खाऊचे वाटप करण्यांत आले. हा कार्यक्रम प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबविण्यात आला. यावेळी लायन्स कल्ब प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र सकपाळ, अध्यक्ष शिवानी जंगम, उपाध्यक्ष लहू भोईर, भरत पाटील, किशोर पाटील, अशोक पाटील, हरिभाऊ जाधव, कांचन जाधव, महेंद्र सावंत, तानाजी चव्हाण, रणजित ग्रोव्हर तसेच सरपंच, उप सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version