| रसायनी | वार्ताहर |
तोडकं मोडकं नाट्यसंस्था यांच्यावतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रसायनी पाताळगंगा परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी चावणे, जांभिवलीवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करण्यात आली व पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे मत्त्ववपूर्ण समाजकार्य तोडकं मोडकं नाट्यसंस्थेकडून द्वितीय वर्धापनदिनानिमित्ताने करण्यात आले. या सामाजिक संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी विक्रम जाधव, सुजित परब, अंकिता परब यांच्या मदतीने हे शक्य झाले आहे. या कार्यक्रमासाठी रा.जि.प शाळा चावणेचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील व रा.जि.प शाळा जांभिवलीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, समाजसेवक विक्रम जाधव, चावणे गावचे रहिवासी राकेश पाटील व तोडकं मोडकं संस्थेचे अध्यक्ष वृषभ मांडवे, उपाध्यक्ष दिव्या पेटकर, सल्लागार रोशन मते आदी कलाकार उपस्थित होते.