| कर्जत | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उकरुळ येथे ‘अवधूत साठे ट्रेडिंग कंपनी’च्यावतीने बुधवारी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कर्जतच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सरपंच नीलिमा योगेश थोरवे, अवधूत साठे ट्रेडिंग कंपनीच्या गौरी साठे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मते, साधना हजारे, अर्चना म्हसे, प्रा. ज्ञानेश्वर वाडीले, प्रा. श्रीकृष्ण सुपे, शिक्षिका जान्हवी खंडकर, हरिश्चंद्र जाधव, कांचन पाटील, प्रताप गिते, चौरे, शारदा निवाते आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी जिद्द बाळगायला हवी. त्यातून आपल्या गावाचे आणि कुटुंबाचे नाव मोठे होत असते. गावासाठी काहीतरी करण्याचा हेतू मनात ठेवला तर नक्कीच यश मिळते. विद्यार्थ्यांनीही आतापासूनच अभ्यासात खूप कष्ट घ्यायला हवेत, आपल्या कलागुणांना वाव द्या, असे मार्गदर्शन सुवर्णा जोशी यांनी केले. दरम्यान, कर्जत तालुक्यातील टाकवे शाळेला लॅपटॉप, प्रिंटर, भिसेगाव शाळेतील 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, जनता विद्यालय दहिवली येथे 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वेणगाव येथील शाळेला सहा पंखे देण्यात आले.