| माथेरान | वार्ताहर |
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षात पदार्पण करताना आपला आनंद लहान मुलांना सोबत घेऊन द्विगुणित करावा याच मुख्य हेतूने प्रेरित होऊन मुंबई येथील अजित शहा,सुरभी शहा,भारती दलाल, मुकेश दलाल या दांपत्यानी येथील नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले.
जवळपास 150 पटसंख्या असलेल्या या शाळेत सर्वसामान्य कष्टकरी लोकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर तिन्ही अंगणवाडीच्या मुलांनादेखील खाऊचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नितीन शहा, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे, शिक्षक लक्ष्मण ढेबे, सचिन भोईर, संतोष चाटसे, अमोल अंधारे, साक्षी कदम, मनिषा चौधरी, किरण शिंदे, पाटील आदी उपस्थित होते.







