विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अदानी फाऊंडेशन दिघी पोर्टचा पुढाकार

मुरुड जंजिरा | वार्ताहर |

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या वतीने दिघी, कुडगाव, मणेरी, नानवली, कर्लास या भागातील एकूण आठ प्राथमिक शाळांतील पहिलीच्या 150 विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत स्वामी, गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, केंद्रप्रमुख वामन खोपटकर, धामणकर, कुडगाव सरपंच प्रमिला मेंदाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अदानी दिघी पोर्ट सुहास भागवत, सुधाकर तायडे, उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य, समाज अध्यक्ष, कुडगाव मराठी शाळा मुख्याध्यापक मार्कड, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
अदानी फाऊंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. शाळा प्रवेशोत्सव प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरण देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना एक ओळख मिळावी हा एक मुख्य उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग किट वाटप करण्यात आले. यामध्ये वॉटर बॉटल, पाटी, लेखन चित्रकला बुक, स्केच पेन, पेन्सिल, रबर, कटर, बुक वर्णमाला पुस्तक आदीचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक सुदर्शन बिडवे यांनी, तर आभार मुख्याध्यापक मार्कड यांनी मानले.

Exit mobile version