| आंबेत | वार्ताहर |
लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संदेरी येथील पीएनपी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नारायण गरमे यांच्या पुढाकारातून करण्यात आला. संदेरी येथील पीएनपी शाळेतील एकूण 80 विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी राजेश गमरे, दिनेश गमरे, अशोक गमरे यासोबत पीएनपी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.