। पाली । वार्ताहर ।
क्रांती ग्रामीण विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे व छत्री वाटप करण्यात आले.
कोव्हिड संकटात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या भावनेतून येथील क्रांती ग्रामीण विकास सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यावेळी 35 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे व छत्री वाटप करण्यात आले. या उपक्रमात तहसीलदार दिलीप रायन्नवार, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार भोईर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गोळे, खेडेकर, अरविंद फणसे आदी मान्यवर सहभागी झाले होते.