हमरापूर | प्रतिनिधी |
मेकिंग द डिफरन्स संस्था व कल्पतरु संस्थेच्या माध्यमातून पेण तालुक्यांतील हमरापूर गावातील गणेश मुर्तींचे काम करणां-या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मेकींग द डिफरन्स संस्थेचे अध्यक्ष दिपक विश्वकर्मा, कल्पतरुचे अध्यक्ष ललित तिवारी, संपर्क प्रमुख अशोक थोरवे, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हाञे, कृणाल थोरवे, हमरापूरचे सरपंच प्रदीप म्हाञे, महाराष्ट्र गणेश मुर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हाञे, हमरापूर विभाग श्री गणेश मुर्तिकार उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ मोकल, विभागप्रमुख लवेंद्र मोकल, हमरापूर अध्यक्ष किरण मांगरुळकर, किशोर पाटील, सचिन पाटील, विनोद नाईक, संदेश कदम, कृणाल पाटील, सुभाष दाभाडे, राकेश दाभाडे, संदिप पाटील, मयुर मांडलेकर, सचिन गोलिमडे, प्रकाश भगत, बाबु एणपुरे, बबन चव्हाण आदींसह कामगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना कल्पतरु संस्थेचे प्रमुख ललित तिवारी यांनी आपल्याकडे नुसती संपत्ती असून उपयोग नाही तर त्या संपत्तीपैकी काही हिस्सा हा गोरगरिबांना दान करावा हाच हेतू असून दुस-यांना मदत करताना खूप समाधान वाटतं. त्यामुळेच ही मदत केली असल्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हाञ, सरपंच प्रदिप म्हाञे यांनीही आपले विचार मांडले.